उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूक,   वाशी आणि लोहारा नगरपंचायतींची निवडणूक असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मतदानाच्या एक दिवस अगोदर तथा मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास आगोदर म्हणजेच 16 जानेवारी 2022 सायंकाळी 5 वाजेपासून ते 17 जानेवारी रोजीचा संपूर्ण दिवस. मतदानाचा दिवस  दि. 18 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, तसेच मतमोजणीच्या दिवशी 19 जानेवारी2022 रोजीचा संपूर्ण दिवस मतमोजणी असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी (स्थानिक) सर्व देशी, विदेशी, एफएल बिअर -2 दुकानांवर मद्य विक्रीस बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. या आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असेही या आदेशात म्हटले आहे. 

 
Top