तेर / प्रतिनिधी :- 

तेर (ता. उस्मानाबाद)येथे संत गोरोबाकाकाच्या समाधी मंदिर परीसरात गेली आठ दिवसापासून ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची रविवार दि.30 रोजी हभप महादेव महाराज राऊत बीड यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरणात सांगता झाली

तेर ता उस्मानाबाद येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली परंपरा यावर्षी कायम ठेवत दिनांक 23 ते 30 जानेवारी या कालावधीत मोजक्याच भाविक भक्तांसह नागरिकांच्या उपस्थितीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत अखंड हरिनाम सप्ताह श्री गाथा पारायण व संगीतमय शिवचरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी या सप्ताह सोहळ्यानिमित्त दररोज काकडा भजन , विष्णू सहस्त्रनाम , गाथा पारायण , हरिपाठ , हरिकीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमा बरोबरच तेरसह परिसरातील कीर्तनकाराची कीर्तनसेवा संपन्न झाली तर रविवार दिनांक ३० रोजी सकाळी गावांतून टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा जयघोष करत गाथा ध्वज कलशासोबत प्रदक्षिणा घातल्यानंतर हभप महादेव महाराज राऊत बीड यांची काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाच्या वाटपाने सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता झाली

 

 
Top