परंडा / प्रतिनिधी :- 

स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी उराशी बाळगून जीवनात यश संपादन करावे असे मत फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी क्रांती करियर एकेडमी परंडा येथे उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.ते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यावेळी उपस्थित होते.

    परंडा येथे डीएड कॉलेज शेजारी देवगाव रोड परांडा येथे क्रांती करिअर अकॅडमी निवासी व अनिवासी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे .या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी क्रांती करिअर अकॅडमी चे संचालक प्रा विकास काळे, संचालक प्रा पांडुरंग कोकणे, संचालक  प्रा प्रदीप शिंदे , शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्रा विजय जाधव आणि क्रीडा प्रशिक्षक दीपक ओव्हाळ यावेळी उपस्थित होते. 

या उद्घाटन प्रसंगी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी  कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक  प्रा पांडुरंग कोकणे यांनी केले.पुढे बोलताना डॉ चंदनशिवे म्हणाले की सध्या स्पर्धेचे युग आहे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर ध्येय निश्चित करून जीवनात यशस्वी व्हावे.या प्रशिक्षण केंद्रामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी याविषयी संपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे .याचा परंडा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी लाभ घ्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा विकास काळे यांनी मानले.


 
Top