उस्मानाबाद / प्रतिनिधी-     

 शासनाने शेतक-यांच्या सन्मानार्थ  पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. या नुसार  शेतक-यांना वर्षात तीन टप्यात प्रत्येक चार महीण्याला प्रत्येकी दोन हजार रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा केले जातात. आजतागायत दहा हफते देण्यात आले आहेत अकरावा हफता हा एप्रिल 2022 मध्ये असून त्यासाठी इ-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.  त्यासाठी 31 मार्च अंतिम मुदत करण्यात आली आहे.

 इ-केवायसी साठी पासपोर्ट फोटो ओळखिच्या पुराव्यासाठी मतदान ओळखपत्र, आधार ओळखपत्र, पॅन ओळखपत्र  किंवा पासपोर्ट ओळखपत्र असणे गरजेचे आहे. आपण घरी बसुन किंवा सेतु सुविधा केन्द्र मध्ये देखिल इ-केवायसी करु शकता या साठी 31 मार्च अंतिम मुदत करण्यात आली आहे.तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर इ-केवायसी करुन घ्यावे असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

  यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह,  तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टउस्मानाबाद, कृषी महाविद्यालय,गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.


 
Top