उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवसेनेच्या वतीने 2515 निधी अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता व मेंढा याठिकाणी सिमेंट रस्ता काम मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन धुत्ता येथे शिवसैनिक पिंपरे यांच्या हस्ते तर मेंढा येथे सरपंच शशिकला विश्वनाथ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांच्या प्रयत्नातून धुत्ता येथील 2515 निधी अंतर्गत मंजूर झालेल्या सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन धुत्ता गावचे शिवसैनिक काकासाहेब पिंपरे, आबासाहेब पिंपरे, माजी सरपंच अमोल मस्के ग्रामपंचायत सदस्य युवराज पिंपरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होतेे.

  तसेच मेंढा येथील 2515 निधी अंतर्गत मंजूर झालेल्या सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन मेंढा गावचे सरपंच शशिकला विश्वनाथ कांबळे, ग्रामसेवक श्रीमती नाईक, शिवसेना विभागप्रमुख बापू ढोरमारे, अशोक पाटील, बाबासाहेब जावळे, अशोक चव्हाण, बाबुराव मेंढेकर, दशरथ सगर, अरुण शेटे, प्रशांत जावळे, मोहन पवार, बाळासाहेब जावळे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top