उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलिस वर्धापन दिनानिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू  शाळेतील विद्यार्थ्यांनी शहर पोलिस ठाण्यास भेट देऊन पोलिस ठाण्याचे कामकाज कसे चालविले जाते ? याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयंत जैस्वाल यांच्याकडून दि.२ रोजी जाणून घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याची माहिती देवून पोलिस कशा पद्धतीने काम करतात,  कायदा व पोलिस नागरिकांचे कशा प्रकारे संरक्षण करतात ? याबद्दल सखोल माहिती दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक आर.पी. जाधव, पोलिस कर्मचारी स्वामी यांच्यासह पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासन या विषयी माहिती दिली. तसेच मुलींनी भविष्यात एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. परीक्षेच्या माध्यमातून पोलिस अधिकारी बनून देशाची सेवा करावी. तसेच विद्यार्थ्यांनी काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.  यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलीमोद्दिन यांनी पोलिस प्रशासनाने विद्यार्थ्यांना माहिती दिल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे आभार मानले. यावेळी इफ्तेखार पटेल, अझर, चव्हाण व अहेमद इनामदार आदी उपस्थित होते.

 
Top