उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवराज्याभिषेक सोहळा समिती,उस्मानाबादची शिवजयंती महोत्सव 2022 साजरा करणे बाबतची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा करणेबाबत सखोल चर्चा झाली.कोवीड संदर्भात शासनाचे नियम पाळून व समाज हिताचे कार्यक्रम आयोजित करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.शिवजयंती महोत्सव मध्ये समाजातील सर्व घटकांना,जाती धर्मातील लोकांना सहभागी करून आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व प्रशासनास सहकार्य करून शांततेत शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले आहे.

बैठकीस शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे जेष्ठ मार्गदर्शक  नंदकुमार नन्नवरे ,जेष्ठ मार्गदर्शक गुंडोपंत जोशी गुरूजी,जेष्ठ मार्गदर्शक पुरातत्व अभ्यासक इतिहास संशोधक जयराज खोचरे,जेष्ठ मार्गदर्शक ॲड.संजय शिंदे,जेष्ठ मार्गदर्शक मुख्याध्यापक  दत्तात्रय वीर  ,जेष्ठ मार्गदर्शक नानासाहेब डोंगरे,जेष्ठ मार्गदर्शक  हरिश्चंद्र आगळे टेलर यांनी समितीच्या गेल्या 20 वर्षाच्या वाटचाली बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.सदर बैठकीस समितीचे अध्यक्ष  शशिकांत खुने,उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी, सचिव  दत्तात्रय साळुंके, कार्याध्यक्ष  रवी मुंडे,डाॅ.शतानंद दहिटणकर,  कंचेश्वर डोंगरे,संघटक अच्युत थोरात मेजर, अमोल पवार,निशिकांत खोचरे,कायदेशीर सल्लागार ॲड. प्रशांत जगदाळे,कोषाध्यक्ष  सुनिल मिसाळ,गणेश नलावडे, विकास जाधव,प्रवक्ते आनंद जाधव, धनंजय साळुंके, रियाज शेख,प्रसिद्धी प्रमुख  अशोक गुरव, मच्छिंद्र कांबळे,संतोष घोरपडे,मिडीया सेल प्रमुख नितीन वीर,दत्ता जावळे,मनोज शेलार इ.पदाधिकारी उपस्थित होते.तसेच समाधान चोपडे,सुभाष वीर, हनुमंत कदम,अभिजीत सुरवसे,गोरख गुरव,बापूसाहेब जगताप,नानासाहेब माने,सचिन कदम, विक्रम गरड,निलेश जावळे,पद्माकर भिंगडे,मनिष देशमुख, रावसाहेब शिंदे, किशोर भोंग, प्रकाश जगताप, उमाकांत चित्राव, ओमकार शितोळे,सचिन पांढरे,व्यंकट कोळी,सुजित ढगे,रमेश यादव,समाधान नांदे,तानाजी जावळे,राजेंद्र सुरवसे,बालाजी पवार, जयवंत खुने,सोनू पाटील, हनुमंत देवकते,ज्ञानेश्वर मते,विकास चोंदे,काशिनाथ आगळे,अमर मगर,बालाजी शित्रे,मारूती हिंगमीरे,विनोद चोबे,स्वप्नील पाटील,विजय बागल,विजय कोकाटे,आकाश निंबाळकर,सुभाष मैरान,पवन मंजुळे,महंमद शेख,अल्लाउद्दीन शेख,समिर मुलानी,सुदर्शन बुकन, नवनाथ क्षीरसागर, पोपट गरड नितीन फंड, योगेश आतकरे, इ.सह शेकडो सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शतानंद दहिटणकर यांनी तर आभार प्रदर्शन  रवी मुंडे यांनी केले.


 
Top