उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील नगर परिषद शाळा क्र.१४ चे प्रभारी मुख्याध्यापक साहित्यिक पंडित कांबळे यांना औरंगाबाद येथील साप्ताहिक झेपच्यावतीने दिला जाणारा  मातोश्री हरणाबाई जाधव पुरस्कार २०२० देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. हा पुरस्कार कांबळे यांच्या चरथ भिक्खवे या कविता संग्रहास मिळाला आहे.

 औरंगाबाद येथे झालेल्या ११ व्या साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. वासुदेव मुलाटे व प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व फेटा बांधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे संयोजक डी.एन. जाधव, प्रा. शिवाजी वाठोरे, पुंडलिक अतकरे, उत्तम बावस्कर, डॉ. बलराज पांडवे, ए.बी. साळवे, डॉ. सावली राऊत आदी उपस्थित होते. त्यांचे २ कवितासंग्रह, ३ बाल कविता संग्रह, २ वैचारिक संपादनाची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल योगीराज वाघमारे, जयराज खुने, यु.डी. गायकवाड, राजेंद्र अत्रे, अभिमन्यू इंगळे, सुरेश गायकवाड, राजेंद्र धावारे यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top