तुळजापूर  / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी नारायण नन्नवरे यांची निवड झाली आहे. फेडरेशनच्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. नारायण नन्नवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यांनी यापूर्वी २०१२-१३ मध्ये फेडरेशनचे चेअरमनपद भूषवले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक सहकारी संस्था माधव अंबिलपुरे होते. याप्रसंगी भाजपचे नेते सतीश दंडनाईक, प्रदीप शिंदे, संघाचे संचालक तात्यासाहेब गोरे, गफार काझी, शंकर वाघमारे, हरिश्चंद्र मिस्किन, धनंजय हांडे, बिलाल तांबोळी, मनीषा पाटील आदींची उपस्थिती होती. नन्नवरे यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींनी अभिनंदन केले. नन्नवरे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी तुळजापुरात फटाके फोडत व कुंकवाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.


 
Top