वाशी / प्रतिनिधी-   

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व ग्रामीण रुग्णालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ताणतणाव निवारण व आरोग्य तपासणी शिबीर दि 26 डिसेंबर २021 रोजी संपन्न झाले. 

   यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुहास शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश कानडे मानसोपचार तज्ञ जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप केला. व. श्री. तुंदारे परमेश्वर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

या कार्यक्रमात एकुण 165 रुग्णांनी लाभ घेतला, यावेळी बीपी, शुगर, एचआयव्ही आदी तपासण्या करण्यात आल्या. व मानसिक रुग्णांना औषधोपचार देण्यात आला. 

    या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयाचे डॉ.महेश कानडे.डॉ.विक्रांत राठोर,डॉ.श्री.धीरज पाटील, डॉ. आत्तापर्यंत सर, श्री. सुहास शिंदे, श्री. परमेश्वर मुळे, श्री. बळराम पोतदार, श्रीमती हर्षदा   नारायणकर, श्रीमती पल्लवी भालेराव, श्रीमती शुभांगी रेखांश तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद शिंदे सर, डॉ. रासवे  सर, डॉ. अमर तानवडे, डॉ. संजीव गरड, श्रीमती महादेवी महातो, श्री. बाबासाहेब नितळ, श्री. संतोष बुधोडकर, श्री. कुलदीप सोनकांबळे, श्री. गफार शेख, श्री. आकाश ननवरे,श्री.निकेश कोळी, श्री. अभिजीत लंगडे, श्री. मनोज डांगे व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top