तुळजापूर / प्रतिनिधी-  

 काक्रंबा येथे आँनलाईन चक्री जुगार अड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने  बुधवार दि.१५रोजी  २१.४० वा.  छापा मारुन रोख रक्कमेसह ३८६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोर  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश गडवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा मारुन उमेश वसंत खांडेक,  फिरोज अन्सारी, बाबुरावा साबळे सर्व (रा काक्रंबा ) यांच्याकडून  एकूण ४ हजार 620 रुपये रोख रक्कम व चक्री जुगाराचे साहित्य लॅपटॉप,  माऊस,  कीबोर्ड मोबाईल असे एकूण 38 हजार 620 रुपये किमतीचा रोख रक्कम व मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी पोलिस स्टेशन तुळजापूर येथे   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास बीट अंमलदार  मिटके करीत आहेत. 

 
Top