तुळजापूर / प्रतिनिधी-
राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबाद -सोलापूर महामार्गावर बार्शी रोड पुलावर दि.१० डिसेंबर रोजी क्लोजरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार, अकरा जखमी झाले. हा अपघात शुक्रवार दि.१० रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला .
याबाबतीत अधिक माहिती अशी की, पंढरपूर कडे दर्शनासाठी जाणारी क्लोजर (क्रमांक MH31V3281 ) ही पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुळजापूर घाटात आल्यानंतर हा अपघात झाला. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर क्लोजर्स गाडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या अपघातामध्ये शेवगाव (जि.जालना ) येथील 11 युवक तरुण आहेत तर घनसांगवी (जि,.जालना) येथील एक तरुण आहे असे एकूण बारा जण अपघातामध्ये होते .या अपघातात मध्ये विठ्ठल वारडकर (वय 31वर्ष ) हे मयत झाले असून जखमींमध्ये वैभव नारायण धुमाळ , प्रल्हाद गणेश वारडकर रमेश यावले ,गार्वधन धुमाळ , मंगेश धुमाळ ,रोहित धुमाळ , योशिश धुमाळ , केशव उगले ,महेश धुमाळ , रामेश्वर परमेश्वर धुमाळ , क्लोजर चालक दगुड काकडे असे जखमींची नावे आहेत .सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक विकास माळी,पोलीस ज्ञानेश्वर माळी,पोलीस सनी शिंदे,ए एस आय चालक रवी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत कार्य सुरू केले .पुढील उपचारासाठी जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथून जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे हलविण्यात आले आहे .