उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 अॅम्युचर अॅथलेटिक्स असोसिएशन उस्मानाबाद जिल्हा व श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रॉसकन्ट्री अॅथलेटिक्स (मैदानी) क्रीडा स्पर्धेचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय रणदिवे,जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. भाग्यश्री बिले मॅडम,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप,सचिव योगेश थोरबोले, सहसचिव राजेंद्र सोलनकर , क्रीडा अधिकारी कैलास लटके,चेतन वाठवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी आपल्या मनोगतात उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देऊन खेळ हा दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक असून प्रत्यकानी कोणत्यानाकोणत्या खेळात सहभाग नोंदवला पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच खेळाडूंना अॅथलेटिक्स उत्तम दर्जाचे साहित्य व सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.योगेश थोरबोले यांनी या स्पर्धेत कोणकोणत्या क्रीडा बाबी घेतल्या जाणार आहेत व वयोगट सांगून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील 300 ते 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेतील सहभागी खेळाडूना उत्तरेश्वर सोने, खोसे सर यांच्या ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद यांनी बिब नंबर दिले त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय कोथळीकर यांनी मांडले या स्पर्धेमधे निवड समिती सदस्य म्हणून श्री. राजेंद्र सोलंकर,राजेश बिलगुले,योगेश उपळकर,मुनीर शेख,माऊली भुतेकर,अजिंक्य वराळे,राम भुतेकर,रोहित सुरवसे,रविराज घाडगे,प्रशांत बोराडे,कृषिकेश काळे,अश्विन पवार,राहुल जाधव इ.व  या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक उपस्थितीत होते.

 
Top