उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जुगार, दारू आदीचे व्यसनामुळे पैशाची उणीव भासू लागली. यातुन आरोपी विष्णू उर्फ बबन पवार  हा आईला म्हताऱ्याला जमीन विकायला का लावली या कारणावरून आई, वडील, पत्नी हयांना शिवीगाळ व मारझोड करत असे तसेच राहिलेली शिल्लक जमीन बहिणीच्या नावे करण्याच्या संशावरून  आराेपीने आई मुद्रीका बालाजी पवार यांच्या डोक्यात िपतळी समई मारून निघृण खून केला. प्रकरणी सुनावणी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालय वर्ग ३ चे जिल्हा सत्र  न्यायाधिश मखरे मॅडम याच्या समोर  झाली. समोर आलेल्या पुरावे पाहता  न्यायालयाने आरोपी  विष्णू उर्फ बबन पवार यास  जन्मठेपेची शिक्षा शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी सुनावली आहे.

 याबाबत  अतिरीक्त शासकीय अभियोक्ता जयंत व्ही. देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी बबन उर्फ विष्णू पवार हा त्याचे आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले यांच्यासमवेत सावरगाव पुर्नवसन, कळंब येथे राहत होता. 

दि.११सप्टेबर २०१७ रोजी मयत, फिर्यादी, तिची मुले व आरोपी हे माळेगाव (ता.केज) येथुन सायंकाळी ४ वा. घरी आले. त्यानंतर आरोपी हा बालू काळे याचे दुकानात जावुन दारू पिला होता. मुद्रीकाबाई  भजनाला जावुन  घरी परत आली. फिर्यादी ही मुलासह घरी बसली असताना आरोपी विष्णु पवार हा  घरी आला.  आरोपीने त्यांना माझी बाहेर भांडणे झाली आहेत. मला त्यांना मारायचे आहे मी तुम्हाला माळेगावला सोडुन येतो, पिशव्या भरा असे म्हणालेवर फिर्यादीने भितीने सामान भरले व मुलांना सोबत घेवुन निघाली. तेव्हा मुद्रीकाबाईने त्यांना माझया गोळया घेतल्या का ? असे म्हणताच आरोपीने एकदम रागात येवुन मुद्रीकाबाईला म्हणाला की ‘तु म्हता-यास जमीन विकायला लावलीस, तसेच घराची जागा लेकीच्या नावावर करायला निघालीस’ असे म्हणुन हाताने तिचे गालावर चापटा मारल्या व देवासमोरील पितळी समईने डोक्यात जोरात मारल्याने ती खाली पडली. तेव्हा फिर्यादीने आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीस ढकलुन दिले. सदर आरोपीने मुद्रीकाबाईला ओढत आतल्या खोलीत नेवुन तेथील लाकडाचे ढलपीने डोक्यात जोरात मारले. तेव्हा मुद्रीकाबाईने आरोपीला ‘मला मारू नको रे’ म्हणुन विनवणी करीत असताना आरोपीने पुन्हा स्टील बकेटने तसेच स्टीलचे हांडयाने चेह-यावर, डोक्यात जोरात मारले. तेव्हा आरोपीने फिर्यादीस मी आईला मारल्याचे कोणाला सांगितले तर तुला व लेकरांना जिवेच मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीस व तिच्या लहान मुलांना घेवुन माळेगावला गेला तेथे गेल्यावर फिर्यादीने नंदावा, नणंद यांना सांगितले. त्यांनी कळंब येथे येवुन पाहणी केल्यावर ती मरण पावली होती. मुद्रीकाबाई पवार हीस विष्णु उर्फ बबन पवार याने जिवे ठार मारले आहे वगैरे फिर्यादवरून गुन्हा नोंद केला.   

सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकुण १० साक्षीदार तपासण्यात आलेले होते. आरोपीची पत्नी व दोन लहान मुले हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तर आरोपी गुन्हा केल्यानंतर त्याचा मेव्हणा याला सदर घटनेबाबत कल्पना दिली. त्या साक्षीदारांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावा, अति.जि.शासकीय अभियोक्ता जयंत व्ही. देशमुख यांनी शाबीत केला. यावर कोर्ट निष्कर्षास आले व आरोपीस आजन्मकारावास व रक्कम रू.२०,०००/- दंड, दंड न भरल्यास पाच महिने सक्षम कारावास अशी शिक्षा सुनावली. 

सदर प्रकरणाचा तपास कळंब येथील तात्कालीन मसपोनी सौ.सुरेखा संजय धस यांनी केला.

 
Top