उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‘म्हाडा’ची  रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची रात्री 2 वाजता ट्वीट करत ही माहिती दिली आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थीनी स्वखर्चाने एसटी बंद असताना,घे भल्या तिकिटाने खाजगी वाहनाने पोहचून हजर झाले होते. ही गोष्ट युवा मोर्चाच्या लक्षात आली असता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात  युवा मोर्चाने तुळजापूर येथे या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.

यावेळी आनंद कंदले,दयानंद मुडके, दिनेश बागल,राम चोपदार, सागर पारडे, विशाल पाटील,सुरज शेरकर, स्वप्नील नाईकवाडी ,कुलदीप भोसले,  राजेश्वर कदम व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top