उस्मानाबाद (प्रतिनिधी)

प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबादच्या 102 व्या शाखेचे मौजे महादेववाडी येथे उद्घाटन करण्यात आले. 

सदरील शाखेचे उद्घाटन प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे संघटक बाळासाहेब कसबे,जिल्हाउपाध्यक्ष नवनाथ मोहिते,अध्यक्ष दादासाहेब अकोसकर,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर,तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोईटे,शिवकुमार माने,विठ्ठलवाडी शाखाध्यक्ष दत्ता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती

महादेववाडी शाखाध्यक्षपदी नानासाहेब वाघे,उपाध्यक्षपदी रणजित शिंदे,सचिवपदी बालाजी नवले,सहसचिवपदी तानाजी शिंदे यांची निवड करण्यात आली

यावेळी शाखेतील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top