उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दारफळ (ता. जि. उस्मानाबाद ) येथे  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या रु. ०७ लक्ष स्थानिक विकास निधीतुन दलीत वस्तीतील मसामाई देवीमंदिर समोरील सभामंडप बांधकामाचे कामाचे भूमीपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 तत्पर्वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दलित वस्ती भीमनगर येथे विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणखी रु.६ लक्ष निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. गावातील सार्वजनिक शौचालय सुधारणेसाठी रु. ३ लक्ष दिले असून हनुमान मंदिर सभागृहासाठी रु.७ लक्ष देण्याचे आश्वासन दिले. गावातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगीतले. याप्रसंगी त्यांनी गांवातील नागरिकांच्या विविध अडचणी ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी महावितरण बाबत शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. पिकविम्या बाबत देखील तक्रारी आल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज करून पोहोच घेण्याचे आवाहन केले. देना बँकेचे विलीनीकरण बडोदा बँकेत झाल्याने काही शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतील रक्कम मिळण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्यानंतर नंतर आ.राणादादांच्या मार्फत हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावासाठी भरपूर विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सौ. अर्चनाताई पाटील यांचा उपसरपंच सौ. अल्का जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रापंचायत सदस्य सौ. वंदना घुटे, सौ. सोनाली ढवण, मारुती ओव्हळ, रविंद्र जाधव, अविनाश बोरके, माजी सरपंच श्री. प्रमोद पाटील, व सौ. बालीका सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मराज जाधव, विठाबाई सुतार, राजेंद्र इंगळे, आचुत घुटे, आण्णासाहेब ढवण, अनिल जाधव, किशोर घुटे, पवन पांचाळ, नाना जाधव, मोहनराव घुटे, अमोल इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, शहाजी ओव्हळ, शाम ओव्हळ, राजाभाऊ ओव्हळ, देविदास ओव्हळ, विक्रम ओव्हळ, पोपट ओव्हळ, वामन ओव्हळ, अभिमान ओव्हळ, शिवाजी ओव्हळ, राम भालेराव,  प्रभाकर भालेराव, नामदेव हावळे, संदिपान ओव्हळ, अमीतकुमार सुतार, शषीकांत इंगळे, भागवत बोरके, मनोज पाठक, चंद्रहास जाधव, गुणवंत सुतार, भास्कर जाधव, गोवर्धन सुतार, कृष्णा जाधव, संभाजी इंगळे, प्रविण इंगळे, रणजीत इंगळे, नंदु जाधव, जनार्धन ढवण, राजाभाऊ सुरवसे, चाँद शेख, पोपट इंगळे,  संदिपान जाधव, व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top