उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संताजी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा तुळजापुरात दाखल होणार आहे.तेली समाज जोडो अभियान अंतर्गत रथयात्रा संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातुन मार्गक्रमन करत शुक्रवारी दि.17 डिसेंबर सकाळी 8 वाजता तुळजापुर मार्गे मराठवाड्यात दाखल होणार आहे.

राज्यातील समस्त तेली समाज बांधवांशी हितगुज करून त्यांच्या समस्या समजुन घेऊन त्यावर मार्गदर्शन व निवारण करण्यात येणार आहे.तसेच ओबीसी आरक्षण रद्द झालेले आहे.या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुकाप्रमुख,पदाधिकारी व समाज बांधव यांनी नाटगृह नगरपरीषद उस्मानाद येथे सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी केले आहे.

 
Top