परंडा / प्रतिनिधी : -

 दिवंगत जि .प .उस्मानाबाद सदस्य बापूसाहेब अंधारे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पंचायत समिती बार्शी येथे कार्यरत असणारे कृषी अधिकारी किशोर अंधारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माणकेश्वर येथील लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेस ग्रंथालय भेट दिली. 

या ग्रंथालयामध्ये कथा, कादंबरी, वैज्ञानिक गोष्टी, समाजसुधारक, क्रांतिकारक, कॉमिक्स, गणित समावेश असलेली पुस्तके भेट देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचन होऊन सामान्यज्ञान वाढविण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे छत्र हरविलेल्या माणकेश्वर मधील 35 अनाथ मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.या कार्यक्रमात एन एम एन एस परीक्षेत राज्यात द्वितीय आलेली पिऊ प्रकाश दनाने हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य युवराज कारकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी किशोर अंधारे,मुंबई महानगरपालिका सहायक अभियंता सुहास घोलप हे होते. यावेळी माणकेश्वर मधील सर्व जि प शाळांचे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सरपंच सतीश माळी, उपसरपंच विशाल अंधारे, मनोज अंधारे, शेरू निलंगे,हदीभाई मुकेबिल,श्रीरंगअंधारे,भाऊसाहेब अंधारे, पपु डुकरे,कल्याण देवकते रामभाऊ जैन यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अंधारे यांनी केले तर आभारप्रदर्शन मसलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल गवारे,जनार्धन अंधारे,किसन अंधारे, दिपक अंधारे, वैभव अंधारे,अंकुश अंधारे यांच्यासह बाबा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

 
Top