कळंब / प्रतिनिधी : -

 कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जि.प प्राथमिक शाळेतील शिक्षक अशोक साहेबराव शिंपले व पानगाव येथील जि प शाळेतील शिक्षिका सौ ज्योत्स्ना आशोक शिंपले-मैंदाड या दांपत्यांनी शिक्षण शास्त्र या विषयात पी एचडी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 गेल्या आठवड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मार्फत त्यांना पी एचडी प्रदान करण्यात आली. अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, उस्मानाबाद जिल्हाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच नवोदय व शिष्यवृत्ती साठी निवड झाल्या बधल कु तेजल अरूण सुपनावर (खामसवाडी) आणि कु सृष्टी पांडुरंग लोकरे (खेर्डा) यांना गौरविण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा देण्यात आल्या. 

शिंपले सरांना डॉ. एस.एस देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

कु तेजल आणि कु सृष्टी यांना जि प कन्या शाळा तडवळे येथील धायगुडे सर आणि पुरी सरांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी डॉ लोंढे म्हणाले की,अभ्यासात सातत्य, चिकाटी व कठोर परिश्रम करण्याची इच्छा असेल तर जगातील कोणतेही काम अशक्य नाही. यावेळी  सत्कारमुर्तीनी आपले विचार मांडले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग लोकरे, प्रभु बनाळे, कसपटे सर, ढवळे सर, इ नी परिश्रम घेतले.

 
Top