उस्मानाबाद / प्रतिनिधी :-
केरळ, महाराष्ट्र, मिझोराम राज्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ओमायक्रॉम व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर काय-काय काळजी घ्यावी, याबाबत केंद्राने सुचना दिलेल्या आहेत. आगामी काळात लसीकरण वाढवावे लागणार आहे. येणार्‍या काळात सर्वांनी सतर्क राहण्याची गरज असून सर्वांनी काळजी घेतली तर मोठा उद्रेक होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केले. 
िवशेष म्हणजे शासकीय रूग्णालयात अप्रमाणित औषध सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.  त्यांनी शासकीय रूग्णालयास भेट देण्याची तयारी दर्शवली होती.परंतू  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढल्या महिन्यात आपला दौरा आहे, त्यावेळेस भेट देऊ असे सूचवले व  सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याबाबतही बजावले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर उस्मानाबाद येथे पत्रकारांशी त्या अनाऔपचारिकपणे बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या अप्रमाणित औषधांच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात जे दोषी असतील त्यांना नोटीस बजावण्याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोरोनाचा ओमिक्राॅन व्हायरंट अधिक प्रमाणात वाढला तर संबंधित राज्य लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा निर्णय घेऊ शकते. तसेच यासंदर्भातील अधिकार राज्यांना अगोदरच दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपला प्रसिद्धी माध्यमाचे वावडे 

केंद्रीय आरोग्य राज्यमंञी भारती पवार यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवस दौरा होता परंतु  जिल्हाध्यक्षांनी व अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले नाही. त्यामुळे  भाजपला प्रसिध्द  माध्यमाचे का वावडे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

विशेष म्हणजे जिल्ह्यात  आमीक्रोनचे पाच रुग्ण सापडले आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध गोळ्यांचा तुटवडा आहे. राज्य शासनाने मंजुर केलेल्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या निरीक्षणासाठी केंद्र सरकारची टिम कधी येणार ?  आयुष रुग्णालय कधी सुरु होणार? अप्रमाणीत औषधांचा साठा आदी गंभीर प्रश्न असताना  पञकार परिषद का आयोजित केली नाही , असा प्रश्न  उपस्थित  केला जात आहे.


 
Top