उमरगा  / प्रतिनिधी-

तालुक्यातील  कलदेव निंबाळा येथील शेतकऱ्यांनी सरपंच सुनिता पावशेरे यांच्या नेतृत्वाखाली एकशे आठ शेतकऱ्यांनी  खरीप विमा त्वरीत द्यावा कंपनीवर शेतक-यांना फसविल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन शुक्रवारी दि 17 रोजी  तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

तहसीलदारा मार्फत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बजाज आलाइन्स कडील विमा कामरद्द करून सदर काम शासनानेच करावे. 72 तासात ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची अट रद्द करण्यात यावी.यासाठी महिन्याची मुदत देण्यात यावी.व ऑफलाईनही तक्रार स्वीकारावी.जितकी विमा टक्केवारी मंजूर झाली तितकी रक्कम देण्यात यावी.विमा संदर्भातील सर्व जाचक नियम अटी रद्द करण्यात यावे .आदी मागण्याचे निवेदन दिले. निवेदनावर मंगल माने, सुमन भांडेकर, छबुबाई बिराजदार प्रभावती गायकवाड, रुक्मीण घोटमाळे ,मंगल माने, सुमन भांडेकर, छबुबाई , प्रभावती गायकवाड, रुक्मीण घोटमाळे आदी महिला शेतकरी यांच्या सह गहिनीनाथ बिराजदार,दिगंबर डोणगावे, शरणाप्पा घोटमाळे, बाबूराव पांचाळ,माधव बिराजदार,किसन डिगुळे, केरनाथ गायकवाड, शिवाजी रसाळ, गोरख भंडे, गुरुनाथ कांबळे, बसलिंग बोकडे, ज्ञानेश्वर  बिराजदार, मधुकर सुर्यवंशी, अविनाश भंडे,बाबूराव पांचाळ, गुरलिंग कारभारी, भिमराव बलसुरे,शशिकांत चिंचोले, रमेश तळेकर, भरत साळुके, मधूकर गुगळगावे, बिराजदार ,मारुती गायकवाड, कल्लेश्वर , अमर सुर्यवंशी,जालिंदर ढोणे, विनायक गायकवाड , भागवत लड्डा, दिगंबर बोकडे, आनंद पाटील, तुकाराम घंटे, याच्यासह एकशे आठ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

 
Top