उमरगा  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील दाळींब येथील बोधिसत्व चॅरीटेबल ट्रस च्या बौद्ध विहारास ग्रामसेवक गणेश नरहरी इंगवे यांनी दहा हजार रुपयांची डॉ बाबासाहेब आंबेडकराची दुर्मिळ पुस्तके भेट दिली आहेत. गुरुवारी दि 16 रोजी बुद्ध विहारात पूजेचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी इंगवे यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ ग्रंथ विहारात मोफत वाचणास उपलबद्ध व्हावेत आणि विध्यार्थ्यांनी या ज्ञान भांडाराचा लाभ घेऊन उच्य विद्या प्राप्त करावी या उदात्त हेतूने रामपूरचें ग्रामसेवक येथील रहीवाशी गणेश इंगवे यांनी 65 ग्रंथ भेट दिले त्याची किंमत दहा हजार रुपये आहे.बौद्ध विहार कमिटीचे कार्यकर्ते खंडेराव सुरवसे, अभिमन्यू गायकवाड, मारुती कांबळे, सुधाकर गायकवाड, अर्जुन कांबळे,मधुकर सुरवसे, विश्वभंर गायकवाड, उंबर गायकवाड आदींनी  पुस्तकाचा स्वीकार केला. गावातील नागरिकांना या पुस्तकाचा उपयोग होणार असल्याचे मत शिवाजी टीकांबरे यांनी व्यक्त केले या प्रसंगास अनुसरून अभिमन्यू गायकवाड, व्ही. एन. गायकवाड, गणेश इंगवे यांची भाषणे झाली सुधाकर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी ट्रस्ट च्या संचालक अंजनाबाई सुरवसे, सुनीता सुरवसे, शिता गायकवाड, अनुसया गायकवाड, सुंनंदा ढगापुरे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top