उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श  समाज निर्माण करण्यात शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिक्षण घ्या, शिक्षणाने समाज घडतो असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले

आपण आरक्षणासह धनगर समाजाच्या सर्वच मागण्या मान्य करण्यास प्रशासनाला भाग पाडू. त्यासाठी धनगर समाजाने सर्व प्रथम संघटित होने ही काळाची गरज आहे. ते उस्मानाबाद येथे धनगर समाज जनजागृती आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ मराठवाडा विभाग व उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने धनगर समाज जनजागृती समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव व कोरोणा योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन  उस्मानाबाद येथील जत्रा फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे हे होते तर मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष अरविंद पाटील, डॉ. गोविंद कोकाटे, डॉ. संतोष पाटील, डॉ. विनोद बर्वे, डॉ. राजेश थोरात, श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे, पिंपरी चिंचवड चे शहर अध्यक्ष महावीर काळे, सौ. सुमित्रा ताई गोरे, जनशुभदा फाऊंडेशन चे सोमनाथ गुड्डे, संजय कवितके यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय खताळ यांनी केले. यावेळी पाचवी नवोदय,  दहावी, बारावी व नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या धनगर समाजातील 30 विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर कोराणा काळात गांव परिसरात उत्कृष्ट व मोलाचे कार्य करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, आशा कार्यकर्त्या व समाज सेवकांचा ही कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महावीर काळे, डॉ. संतोष पाटील, डॉ. गोविंद कोकाटे, सोमनाथ गुड्डे, राम जवान, सौ. रंजना दाणे, सौ. सुमित्राताई गोरे, सुनील बनसोडे व डाॅ. अरशद रजवी  यांनी मनोगत व्यक्त करतांना सकल धनगर संघटित व्हावा यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 पत्रकार राजाभाऊ वैद्य, बिबिशन लोकरे, आकाश नरोटे व प्रशांत सोनटक्के यांचा कोवीड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. 

अध्यक्षीय  समारोप करतांना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रवीण काकडे यांनी उपस्थित समाज बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे, उपाध्यक्ष अरविंद पाटील, जिल्हाध्यक्ष संजय खताळ, जिल्हा उपाध्यक्षसंजय परसे, मोहन रत्ने, नितीन सोनटक्के, विशाल थोरात ; रविकांत शिंगाडे, मोहन राऊत यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार अरविंद पाटील यांनी मानले.


 
Top