उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चाेरीच्या मोबाइलसह चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी तामलवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. स्मार्टफोन चोरी संबंधी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपासा दरम्यान प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडीत यांच्या मार्गदर्शनाखालील हवालदार आनंद गायकवाड, पोलिस कर्मचारी खुणे, शेख यांच्या पथकाने पथकाने सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. यावर तो माेबाईल पांडे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील महेंद्र नाना पवार (२२) याच्या जवळ असल्याचे स्पष्ट होताच पथकाने त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोबाईलसह ताब्यात घेतले आहे.


 
Top