परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील अनाळा येथे स्वंयम शिक्षण प्रयोग संस्था , उस्मानाबाद व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने  महिला संवाद कार्यशाळा दि.१६ रोजी शासकिय गोदामात संपन्न झाली. संवाद कार्यशाळे चे उदघाटन परंडा पं. स.चे कृषी विस्तार अधिकारी एस.ए.बोडके व सरपंच सौ.अंबिका जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या जिल्हा सहाय्यक समन्वयिका सीमा सय्यद होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती सौ.अनुजा दैन , लघु उदयोग सल्लागार गणेश नेटके , स्वयंम शिक्षण प्रयोग चे सम्राट कसबे उपस्थित होते. या महिला संवाद कार्यशाळेत महिलांना विविध शासकिय योजनेची माहिती , स्वयम शिक्षण संस्थेचे महिलांसाठी योगदान याविषयी अनमोल मार्गदर्शन स्वयंम शिक्षण प्रयोगच्या सीमा सय्यद यांनी केले . कृषी विस्तार अधिकारी बोडके यांनी महिलांना बायोगॅस , गांडुळ खत निर्मिती व शासनाच्या विविध योजनेची माहिती देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले . लघु उद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी लघु उद्योग विषयी महिलांना मार्गदर्शन केले . स्वयम शिक्षण प्रयोग चे सम्राट कसबे यांनी स्वयंम शिक्षण संस्थे विषयी थोडक्यात माहिती दिली . मान्यवरांनी महीलांशी थेट संवाद साधत विविध विषयावर चर्चा केली . संवाद कार्यशाळेसाठी परंडा तालुक्यातील अनाळा , रोहकल , साकत [खु , ] साकत [ बु ], पिस्तमवाडी , पिंपरखेड, शेळगाव ,मलकापूर , रत्नापुर , चिंचपूर [खु ] ,कंडारी, इनगोदा आदी गावातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या . हि महिला संवाद कार्यशाळा स्वयम शिक्षण प्रयोगचे संचालक उपमन्यू पाटील , जिल्हा समन्वयक किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परंडा तालुका समन्वयिका  नौशाद शेख , गट समन्वयिका अनिता ठोसर , जयश्री शेवाळे , आशा जगताप , रुपाली शिंदे , रागिणी सावंत , शबाना सय्यद , कामिनी वरपे , आशा कोळी , अश्विनी देवकर , प्रिया हजारे , चंद्रकला चव्हाण , सारिका कोंडणे आदिंनी परिश्रम घेतले . संवाद कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार सम्राट कसबे यांनी मानले .


 
Top