उस्मानाबाद (प्रतिनिधी) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा कायम तेवत ठेवण्याचे अखंडित काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना येणाऱ्या काळात आपण मानाचे पान देऊन यथोचित सन्मान करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे नेते,भूम परंडा आणि वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी दिली आहे.

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेऊन ३० हजार पेक्षा जास्त ऊस उत्पादक सभासदांना आधार देण्याचे काम आमदार सावंत यांनी केला आहे. याबद्दल शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख,अनिल खोचरे यांनी सावंत यांचा सत्कार केला.त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सावंत बोलत होते.

       तानाजी सावंत म्हणाले,उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेला आहे.याची आपल्याला जाणीव आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री आणि  अदित्य ठाकरे पर्यटन आणि राज शिष्टाचार मंत्री आहेत ही मोठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात शिवसेनेच्या भगव्या वर प्रेम करणाऱ्या तळागाळातल्या सामान्य शिवसैनिकांना आपण वाऱ्यावर सोडणार नाहीत. ग्रामीण भागात त्यांचे कार्य,त्यांची ओळख पक्षाची ताकद वाढवणारी आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका निवड प्रक्रिया यामध्ये या शिवसैनिकांना केंद्रबिंदू मानून आपण त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले. तेरणा साखर कारखान्याच्या माध्यमातून आता जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे नेते तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आ.तानाजी सावंत यांनी टाकलेले पाऊल शेतकऱ्यांसाठी आशादायी असल्याचं बोललं जात आहे.

 
Top