उस्मानाबाद (प्रतिनिधी) येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी पतसंस्थेच्या वतीने आशा  शेख रहिमुनिस्सा शब्बीर आणि महिला समुपदेशन केंद्राच्या शारदा गडीले यांचा सत्कार करण्यात आला.

स्वयं सेविका आणि गटप्रवर्तक महासंघाच्या नवीन शहराध्यक्ष म्हणून आशा स्वयंसेविका शेख रहिमूनिस्सा शब्बीर यांची नुकतीच निवड करण्यात आली. याबद्दल ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ तथा अखिल भारतीय काँग्रेस आय प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.स्मिता शहापूरकर यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच अल्पवयात विवाह झालेल्या आणि शारीरिक अत्याचाराला बळी पडलेल्या १३ वर्षीय बाल विवाहितेची सुधारगृहात रवानगी करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल महिला समुपदेशन केंद्रातील शारदा गंडीले यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.

     प्रियदर्शनी इंदिरा गांधी पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नागरी आरोग्य केंद्र क्रमांक १ आशा कार्यकर्ती रेश्मा कांबळे, जेबा शेख,शबाना शेख आरोग्य पथक क्रमांक दोनच्या आशा कार्यकर्ती सलिमा शेख, संध्या तेरकर,अलका वीर, मंजुषा शिंदे,आवेज शेख,नागनाथ नागणे यांच्यासह अन्य मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.


 
Top