उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वाराणसी तथा काशी ही पुरातन नगरी हिंदू धर्मियांच्या अतीव श्रद्धेचा विषय आहे. ऋग्वेदात, स्कंद पुराणात तसेच रामायण-महाभारतात काशीचा उल्लेख आढळतो. अशा या प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या काशी नगरीसाठी जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिव्य काशी, भव्य काशी’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे.

  “दिव्य काशी”, “भव्य काशी” या कार्यक्रमाच्या थेट प्रेक्षपणासह महाआरतीचे आयोजन भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हयाच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उस्मानाबाद शहरातील श्री कपालेश्वर (महादेव) मंदीर येथे महाअभिषेक आणि महाअरतीचे आयोजन करण्यात आले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. या योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी करण्यात आले . या कार्यक्रमात देशभरातील धर्माचार्य, साधू संत, विद्वान-विचारवंत तसेच उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होते .भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या सामाजिक समरसता, एकता आणि अखंडता यांचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून घडले. ‘काशी’ चा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प १३ डिसेंबर २१ रोजी प्रत्यक्षात आला आहे.

  याप्रसंगी यांच्यासह भाजपाचे नेताजी पाटील, सुनिल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर,डॉ.प्रशांत पवार,अभय इंगळे,इंद्रजित देवकते,प्रविण पाठक,  ओम नाईकवाडी, कुलदिपसिंह भोसले, हिम्मत भोसले,  सुरज शेरकर, गणेश इंगळगी, अभिराम पाटील, अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, प्रविण सिरसाठे, सचिन लोंढे, किशोर पवार, गणेश मोरे, नरेन वाघमारे यांच्यासह शहरातील भाजपाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 
Top