उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हंगाम 2021-2022 शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभुत  किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्हयात   एनएमइएल पोर्टल व्दारे तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी चालु करण्यात आली आहे. जिल्हयात नाफेडमार्फत 19 तुर खरेदी केंन्द्र मंजुर करण्यात आली आहेत. खरेदी केलेल्या तुरीला प्रति क्विंटल 6300 दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तुर उत्पादक शेतक-यांना ऑनलाईन नोंदणीसाठी तुर पिकाचा सातबारा असणे आनिवार्य आहे सोबत आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व त्यातील खाते क्रमांक व आयएफसी कोड  दिसावा अशी प्रत असणे अनिवार्य आहे. सब एजंट संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे उस्मानाबाद,टाकळी (बे), उमरगा तालुक्यातील उमरगा,गुंजोटी,लोहारा,मुरुम,कानेगाव,दस्तापुर,तुळजापूर,नळदुर्ग,कळंब,चोराखळी,भुम,ईट,सोन्नेवाडी,वाशी,पारगाव,परंडा येथील खरेदीकेंन्द्रा समोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करावी.त्यानंतर तुर खरेदीस सुरवात झाल्यावर शेतक-यांना एसएमएस आल्यावर तुर विक्रीसाठी आणावी या योजनेचा जास्तीत जास्त तुर उत्पादक शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पणन अधिकारी व शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

 या अधिच खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह,  तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय,गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

 
Top