परंडा / प्रतिनिधी : - 
राष्ट्रवादीने सुडबुध्दीचे राजकारण कधीच केले नाही शिवसेनेची सत्ता असताना शहरातील अनेकांचे दुकाने तोडली जनतेला दिलेला त्रास जनता आज ही विसरली नसल्याचे  नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची वाढती ताकद पाहूनच शिवसेनेने धसका घेतला असल्यानेच शिवसेना - भाजपा सोबत युती व अन्य पक्षाशी बोलून आघाडीची भाषा करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात विकास कामे झाले नाही तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील युती व अघाडी ची भाषा का करीत आहेत असा सवाल करून राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली परंडा नगरपरिषदेची आगामी निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वच उमेदवार निवडून आणू.  रविवार  दि.२६ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राहुल बनसोडे, वाजीद दखणी, सरफराज कुरेशी,संजय घाडगे,बब्बू जिनेरी, शफी पठाण,बच्चन गायकवाड, शरीफ तांबोळी,तनवीर मुजावर, राजकुमार माने, नगर सेवक सह संतोष माळी, किरण डाके आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
     ज्ञानेश्वर पाटील यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या १० वर्षाच्या  कालखंडात आमदार असताना शहरासाठी कोणते विकास कामे केले आहेत ते दाखवुन द्यावे असे आव्हान केले आहे.  राहुल मोटे आमदार असताना शहरातील अनेक ठिकाण च्या स्मशान भुमी,मंदीरा साठी रस्ते अशी अनेक विकास कामे केली असल्याचे सांगीतले आहे. विरोधकांने रस्त्याचे कामे न करताच बिले उचलल्याचे आरोप केले होते.त्या आरोपाचे खंडन केले असून आरोप केलेल्या रस्त्याचे  एक रुपया चे ही बील उचलन्यात आलेला नाही अशी माहिती जाकीर सौदागर यांनी यावेळी बोलताना माहिती दिली.
 गेल्या दोन वर्षा पासून कोरोनाच्या माहामारी मुळे निधी आभावी पोलिस ठाणे ते बसस्थानक पर्यंतच्या रस्त्याचे काम करता आले नाही. पुढील काळात सर्व कामे करणार असल्याचे सौदागर यांनी म्हटले आहे.
     


 
Top