उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना महामारीच्या काळात हॅलो फाउंडेशन अणदूर आरोग्य स्वराज्य प्रकल्प अंतर्गत जनजागृती मोहिम अनुंषगाने घेण्यात आलेल्या भित्तीचित्र (पोस्टर स्पर्धा) स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलचे कलाध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ यांना द्वितीय बक्षीस पात्र झाले आहेत.कोवीडमुळे बक्षीस समारंभ न घेता दि.18 रोजी जिल्हा रूग्णालयात सखी वनस्टॉप सेंटर या ठिकाणी हॅलो फाउंडेशनच्या कायदे विषयक सल्लागार विधिज्ञ प्रियंका जाधव- बारकुल यांचे हस्ते रोख 750 रु. सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र देऊन शेषनाथ वाघ यांना सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी पॅरामेडिकल समुपदेशक चंदुबाई खंदारे, शुभांगी माने, तपासणी कर्मचारी मनिषा जोगदंड, संगणक तज्ञ अमित मुळे, मदतनीस अंजली मगर, सुरक्षा रक्षक संजय आडगळे उपस्थित होते. या पोस्टर स्पर्धेत द्वितीय बक्षीस मिळाल्या बद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस सौ.प्रेमा पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, पर्यवेक्षक किसन हजारे, यशवंत इंगळे, कृष्णा गायकवाड, तुकाराम शेटे, धनंजय देशमुख, सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर,मित्रांनी अभिनंदन केले.

 
Top