उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 67 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले. 

शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने मागील 13  वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी रविवार, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

शिबिराच्या उद्घाटन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास आमदार रणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, शहर वाहतूक निरीक्षक मस्के, नगरसेवक अक्षय ढोबळे , नगर सेवक सोमनाथ गुरव, मा.नगराध्यक्ष  दत्ता बंडगर, अमित शिंदे,  यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.  रक्तदान शिबिरात दिवसभरात 67रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने चहा, फळे व नाष्टा देण्यात आला. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. रक्तदाते, कर्मचारी, कार्यकर्ते यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण कर्मचारी दिवसभर उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी स्वप्निल बनसोडे,  प्रसेनजित सरवदे, प्रज्योत बनसोडे, , नागराज साबळे, दादासाहेब मोटे,  प्रसाद माने, सचिन डोंगरे, दीपक गायकवाड, स्वप्निल बनसोडे, प्रमोद हावळे, रेणुका माने, लक्ष्मी ढाले,  शैलेंद्र शिंगाडे, सुशांत बनसोडे, यशवंत माळाळे यांनी परिश्रम घेतले.


 
Top