उस्मानाबाद (प्रतिनिधी)

उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशन व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब वडगाव सि,ग्रामपंचायत कार्यालय वडगाव यांच्या सयुक्त विद्यामानाने आयोजित केलेल्या कुमार व कुमारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सि येथील मैदानावर संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कैलास दादा पाटील,रवी वाघमारे,बाळासाहेब काकडे,रमेश कोरडे,चंद्रकांत मुळे,वडगावचे युवानेते अंकुश काका मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव,सरपंच बळीराम कांबळे,अनिल निकम,उस्मानाबाद जिल्हा कबडडी संघटनेचे सचिव महादेव साठे सर,उपाध्यक्ष फुलचंद कदम,लक्ष्मण तात्या मोहिते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत हजारे,सुरेश जानराव,राजेंद्र जाधव,आण्णासाहेब पांढरे,गोपाळ येलंबकर,मोहन पाटील,अमरनाथ राऊत,साजीद चाउस,नितीन हुंबे,सचिन पाटील,राजेश सोलंकर,सुब्राव कांबळे,प्रशांत घाडगे यावेळी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील उस्मानाबाद,तुळजापूर,लोहारा,उमरगा,भूम,परांडा,वाशी,कळंब या तालुक्यातून कुमारचे १६ संघ तर कुमारीचे ७ संघ सहभागी झाले असून २७६ खेळाडूनी आपला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपला सह्भाग नोंदवला आहे. 

सदरील जिल्हास्तरीय कबडडी स्पर्धेच्या तांत्रिक कमिटीचे काम रमेश आडे,शेख सर,रोहित घोडके,औदुंबर जगताप,संतोष चव्हाण,सतीश कोळगे,तर स्पर्धेचे पंच प्रमुख म्हनुन मोहन पाटील,भारत जगताप,अनिल शिंदे सर,पोपट पुरी,शाम जाधवर तर स्पर्धा यशस्वीतेसाठी बालाजी पवार,किरण जाधव,सोमनाथ कांबळे,विश्वजीत गुरव,ओमकार मुळे,प्रमोद चादरे,रोहन जाधव,तुकाराम वाडकर,योगेश ताटे,ओमकार मुळे,रंजीत मोरे,दादा जाधव,मुकेश जाधव,समस्त गावकरी तसेच शिक्षक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी पवार तर आभार प्रदर्शन गजेंद्र जाधव यानी केले.सदर स्पर्धेसाठी गावातील ग्रामस्थ तसेच संघटनेचे पादाधिकारी उपस्थित होते.

या संघ ठरले विजयी 

कुमार गट-·प्रथम : शिवनेरी क्रीडा मंडळ भूम

द्वीतीय :संतनाथ क्रीडा मंडळ वडाचीवाडी

तृतीय : सेवा क्रीडा मंडळ शिंगोली

कुमारी -प्रथम : ज्ञानयोग विद्यालय कोथळा

द्वीतीय :स्ट्रायकर क्रीडा मंडळ कानेगाव

तृतीय : महाराष्ट्र क्रीडा संघ परांडा

 
Top