उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भगवान प़पू़ श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त गुरूचरित्र पारायण- भजन-कीर्तन सप्ताह सोहळ्यास श्री तुळजाभवानी मंदिरचे महंत श्री तुकोजी बुवा व महंत श्री मावजीनाथ बुवा यांच्या हस्ते विधिवत मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

 रविवार, दि़ १२ ते शनिवार दि़१८ या कालावधित हा सोहळा संपन्न होणार आहे़ सप्ताहाचे हे ७ वे वर्ष आहे़ उस्मानाबाद शहरातील श्री सदगुरू नगरीमध्ये  पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने भगवान प़पू़ श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी,(दि़१२ ) श्री़ तुळजाभवानी मंदिरचे महंत तुकोजीबुवा व महंत मावजीनाथ बुवा ( तुळजापूर) यांच्या हस्ते सप्ताहास विधीवत शुभारंभ करण्यात आला. 

रविवारी, पहिल्या दिवशी माऊली मंडळाची (गांधीनगर) भजन सेवा संपन्न झाली. यावेळी  जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सप्ताह सोहळ्याचे आयोजक धनंजय रणदिवे यांनी महंत व भजनी मंडळाचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी संतोष बडवे, श्री काजळे , श्री जोशी, बापू देवळकर, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते. विधी पौराहित्य संतोष जोशी यांनी केले. सोमवारी(दि.१३) सखी महिला मंडळाची  (यशवंत नगर)   भजन सेवा होणार आहे.  शुक्रवारी (दि़१७) संत जनाबाई महिला मंडळ (शांतीनिकेतन कॉलनी)  दु. १ ते ५ तर सुप्रसिद्ध भजन- गीतकार शिवकुमार मोहेकर ( अंबेजोगाई, जि. बीड ) यांची संगीतमय भजन सेवा सांय ७ ते १० रंगणार आहे.  यामध्ये दिपश्री संगीत अकादमीचे संस्थापक  दिपक लिंगे व त्यांचे शिष्य सहभागी होणार आहेत़ शनिवारी (दि़१८) सकाळी ६ वाजता श्री दत्तगुरूंचा महाभिषेक, सकाळी ८ वाजता गुरुचरित्र ग्रंथदिंडी, सकाळी १० वा़ हभप नवनाथ महाराज यांची कीर्तन सेवा, दुपारी १२:३० वा. श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव सोहळा व त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. ७ दिवस दररोज सकाळी ९ ते १२ गुरुचरित्र पारायण, दुपारी १ ते ३ व ३ ते ६ भजनसेवा संपन्न होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणने केले आहे.

 
Top