तुळजापूर / प्रतिनिधी-

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी या मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाकडून काळी फीत लावून दि.१४ डिसेंबरपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने सरचिटणीस डॉ. आर बी सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने मागील दोन वर्षापासून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे .  तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापुर, नळदुर्ग येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय अणदूर येथील जवाहर वरिष्ठ महाविद्यालय आदी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्राचार्यांना निवेदन दिले आहेत. राज्य शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील तीन लाभाच्या आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी केली आहे केवळ आणि केवळ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी या लाभापासून वंचित असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी राज्यभरात हे आंदोलन सुरू केले आहे.  

 
Top