उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रशासनाने कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी जनजागृती केली असली तरी  अनेक नागरिक लसीचे डोस न घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या नागरिकांचे शासकीय कार्यालयात कामे आहेत अशा नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवून आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. 

ज्यांनी लसीकरण अद्याप केले नाही अशांना गेटवर थांबवले गेल्याने काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ज्यांचे जिल्हाधिकारी  कार्यालयात कामे होती  ज्या नागरिकांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते अशा नागरिकांना गेट वरून आपली कामे न करताच माघारी जावे लागले आहे. यापुढे ज्या नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयात कामे आहेत अशांना लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र गेटबाहेर दाखवून आतमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५,०६,८२२ कोव्हिड डोस देण्यात आले आहेत पाहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०,१४,५६७ एवढी आहे तर ४,९२,३१५ नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत.

 
Top