वाशी / प्रतिनिधी-

 वाशी शहरातील होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकी संदर्भात आज वाशी येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतिने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

सदर बैठकीमध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतिने निवडणुकीत उमेदवार ऊभा करण्यात येणार असल्याचे एक मताने ठरविण्यात आले यावेळी वाशी नगरपंचायतीचे पहिले उमेदवार म्हणुन लहुजी शक्ती सेनचे जिल्हा ऊपाध्यक्ष मारूती क्षिरसागर यांची उमेदवारी बालाजी गायकवाड यांनी जाहीर केली

यावेळी समस्त समाज बांधवाकडुन सदर ऊमेदवारीचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले या बैठकीस लहुजी शक्ती सेनेचे वाशी तालुकाध्यक्ष अमोल क्षिरसागर, श्रीधर क्षिरसागर, महादेव कांबळे, समाधान क्षिरसागर, दिपक क्षिरसागर, लखन शिंदे,विकास क्षिरसागर, प्रविन क्षिरसागर, विशाल अडागळे, सौरभ क्षिरसागर, कैलास क्षिरसागर, अमोल गायकवाड,दिपक ताटे,अजय बाबर सह शेकडो समाजबांधव ऊपस्थित होते.

 
Top