उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील गणेश नगर हुसेन पूरा येथे अल शिफा ग्रूपच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आलीयामध्ये ४२२ नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली या ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. वैराग रोड प्राथमिक आरोग्य केंद्र यूपीएससी क्र. 1 व अल शिफा ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शकील खाना यांचे  मार्गदर्शन लाभले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे 1 चे बाळासाहेब काकडे, रतनाकर पाटील,  समीर शेख, (ऑपरेटर), शेटे एस. पी (ANM), बारगने ए.आर (ANM), शेख एस. जे, शेख नाझिया, सय्यद फातेमा, आशा बिडबाग (सर्व आशा वर्कर)अजहर मुजवार (समाजसेवक)अल शिफा ग्रूप चे अध्यक्ष इम्रान मुक़ाशी,  नादेर पठाण, आसिफ मोमिन, अक्षय वाळके, सुफियान पटेल, इरशाद पटेल उपस्थित होते. अल शिफा  ग्रूप तर्फे अक्षय वाळके यांनी आभार प्रदर्शन यानी केला.

 
Top