उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शारजा,युएई ( संयुक्त अरब अमिरात ) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला एक 42 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडली असुन आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बावी या गावातील हा पुरुष असून त्यांची तपासणी केल्यावर तो पॉझिटिव्ह सापडला आहे. ओमीक्रॉनच्या अनुषंगाने या रुग्णाचे नमुने जिनोम तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे  पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी २ दिवस लागणार आहेत.

   पालकमंत्री यांनी  दुसऱ्या राज्यात व देशातुन आलेल्या व्यक्ती नोंद ठेवणे, तपासणी करने, असे आदेश दिले होते.  परंतु त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ओमीक्रॉनचा धोका हा सध्या तरी परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीपासून जास्त आहे त्या अनुषंगाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व इतर उपाययोजना होणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांनी मास्क व लस न घेणाऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे चार दिवसापुर्वीच जाहीर केले. परंतू जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह प्रशासकीय मध्यवर्ती इमारत, जिल्हा परिषद व अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात याची कोठे ही तपासणी केली जात नाही. 

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

सध्या ओमीक्रॉनच्या धोक्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिसरी लाट आल्यास उस्मानाबाद शहरासह जिल्हयात आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्हयात एक हजार ऑक्सीजन बेड त्यापैकी उस्मानाबाद शहरात ४०० ऑक्सजीन बेड, तर १०० वेटीलेंटर बेड अशी व्यवस्था आहे. ऑक्सीजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल असे सांगितले.

 डॉ.धनंजय पाटील-जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रूग्णालय उस्मानाबाद 


 
Top