उमरगा / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य स्तर कोल्हापूर, जिल्हा शाखा उस्मानाबाद यांची  नुतन  निवड कर्यकारणी  जाहीर करण्यात आली.  जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा उस्मानाबाद यांची कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात एच .आर शेगर याच्या अध्यक्षतेखाली  शुक्रवारी बैठक घेऊन अभियंता संघटनेच्या नुतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

यावेळी  शाखा अभियंता आर आर सुर्यवंशी यांची जिल्हाध्यक्ष तर उपाध्यक्ष शाखा अभियंता धनंजय आडसुळ ,सचिव अभियंता सुभाष नगदे,कार्याध्यक्ष अभियंता भारत कापसे,कोषाध्यक्ष अभियंता ओ.के.सय्यद, प्रसिद्धी प्रमुख अभियंता बि.एन.देसाई, या सर्व नुतन पदाधिकारी यांची निवड आर .एन.शिंदे यांनी जाहीर करुन सर्व पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष कार्यकारी अभियंता नितीन भोसले यांनी अभियंत्यांना संघटनेचे महत्त्व समजाऊन सांगुन प्रोत्साहन पर मार्गदर्शन करण्यात आले. अभियंता यांची उपविभागीय अभियंता पदोन्ती झालेल्यांचा  सत्कार करण्यात आला.

 
Top