उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यसेवा (पूर्व) परीक्षा -2021 ही  रविवार दि.02 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 आणि दुपारी 03.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत या कालावधीत होणार आहे.ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र असतील तेथे प्रतिबंधत्मक कलम 144 लागू करण्यात येणार आहे.       

या परीक्षेसाठी उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुल, तळ मजला, मेन उमेदवारांची संख्या 240, श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज येथील तीन मजल्यावरील केंद्र,उमेदवारांची एकूण संख्या 1128, श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज (आण्णा ई टेक्नो), नवीन इमारत,मेन रोड  उमेदवारांची संख्या 336,  रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड, उस्मानाबाद,उमेदवारांची संख्या 240, छत्रपती शिवाजी हायस्कुल, तांबरी विभाग उमेदवारांची संख्या 384, विद्यामाता हायस्कुल, सांजा चौक, औरंगाबाद बायपास रोड उमेदवारांची संख्या 240, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलिस स्टेशन जवळ उमेदवारांची संख्या 264, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, तांबरी विभाग, मेन रोड पार्ट-B, उमेदवारांची संख्या 336, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, तांबरी विभाग, मेन रोड  पार्ट-A, उमेदवारांची संख्या 240 असे एकूण 3408 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. 

 परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत.परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर, इंटरनेट कॅफे आदी माध्यमे बंद राहतील. मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशास मनाई राहील. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी आणि कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (परीक्षार्थींच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटरच्या आवारात पाच  किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.

 हा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी, परीक्षाथी, परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश दि. 02 जानेवारी 2022 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू राहतील. या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय दंड विधानचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिले आहेत.

 
Top