तुळजापूर/  प्रतिनिधी-

राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण १०८ प्रकरणात तडजोड करण्यात आली. या मध्ये विविध बँकाचा २५ प्रकरणात तडजोड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी न्यायाधिश व्ही. ए.अवघडे यांचा हस्ते दीप प्रज्वलनाने लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सह दिवाणी न्यायाधिश एम पी जसवंत, आर. बी. खंदारे, सरकारी वकील अमोघ कोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण आदींची उपस्थिती होती.

या लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रलंबित खटल्या पैकी एकूण ५९२० प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यासाठी ठेवण्यात आली होती. या मध्ये धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला ४ लाख ६६ हजार ४६८ रुपयांची वसुली झाली. बॅंक वसुली प्रकरणात ६४ हजार ५८२ रुपये वसुली झाली. दावा पूर्व प्रकरणा मध्ये ६ लाख ६ हजार ५६६ रुपये वसुली झाली. या लोकअदालतीत १० वर्षा पूर्वीचे एक, पाच वर्षांपूर्वीची १४ असे एकूण १५ प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.

 
Top