तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी ) येथील पाच वर्षीय चिमुकल्याचा निघृण खुन करण्यात आल्याची खळबळ जनक घटना शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी उघडकीस आली.
खुन झालेल्या बालकाचे नाव ओम अमोल बागल (५ वर्ष) असे आहे. गुरुवार दुपारी हा लहान मुलगा कामासाठी घराबाहेर पडला होता त्यानंतर तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी व नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला मात्र हा मुलगा सापडू शकला नाही. आज शुक्रवारी सकाळी या मुलाच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला,मुलाचा शरीरावर जखमा असुन गळा दाबुन खुन केला असावा असा प्रथमदर्शी अंदाज आहे.
या घटनने गावातच नव्हे तर तालुक्यात एकच खळबळ उडाली . या मुलाच्या दोन्ही कानात सोन्याची कुंडल्या होत्या. सोन कान तोडुन गायब असल्याचे समोर आले आहे . सदरील बालकाचा मृतदेह शेजारील बंद घरातील पाण्याचा कोरड्या हौदात सापडल्याचे समजते या प्रकरणी काही संशियतांना ताब्यात घेतले असुन खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा तपास लवकरच लागेल अशी माहीती पोलिस सुञाने दिली