उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

मुंबई येथे हिवाळी अधिवेशात थोर संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेशाची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. त्यानंतर   राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री  वर्षाताई गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी त्याच्या सोबत  आमदार  ज्ञानराज

चौगुले व आमदार  संतोष बांगर उपस्थित होते. 

महाराष्ट्रात संतांची परंपरा गेली अनेक दशके सुरू आहे. लोकसेवेचे महान वृत्त संतांनी अंगिकारून, समाजात प्रबोधन करण्यास सुरुवात केली. यातीलच एक संत म्हणजे संत जगनाडे महाराज हे होय. संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 मध्ये चाकण येथे पौराणीक, ऐतिहासिक, आणि उद्योग नगरीत झाला. संताजी महाराज हे तुकोबारायांचे शिष्य व लेखक होते. महाराजांचे तुकोबारायांच्या विचारांशी असलेलं साम्य हे कमालीचे एकरूप भासते. तुकोबारायाची आपल्याला लाभलेली अभंग गाथा हा मराठी भाषेचा संताजी महाराजांचा अनुग्रह आहे. तुकोबारायांची उत्स्फुर्त प्रतिभा त्यांनी केवळ शब्दांकीत व अनुवादितच केली नाही, तर तुकोबारायांची वाड्:मईन अभंग संपदा ही टिकवली आहे तसेच गेल्या तीन शतका पासुन मराठी भाषकांच्या अंत:करणात ती स्थीर पद करण्याचे काम श्री. संत संताजी महाराजांच्या अनन्य साधार कळकळीतून झाले आहे. आपल्या तेलाच्या घान्याची साथ न सोडता भक्ती मार्गात रमले. जे जे काही तुकोबाराय किर्तनात सांगायचे ते शब्दबद्द करण्याचे काम संताजी करत असत. सुलतानी आक्रमनातु झालेला विधवंश व पुराच्या पाण्याची पर्वा न करता जीवापाड वाजवलेले महाराजांचे अभंग हे संताजीचे जीवन सर्वस्व ठरले होते.यांच्या कार्याची माहीती पुढील पिढीस मिळण्यासाठी उस्मानाबाद शहरात प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने काढण्यात आलेली समाज जोडो रथ यात्रा या कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी आमदार कैलास पाटील यांच्याकडे मागणी केली होती की,महाराजांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा या विनंती वरून मा.मंत्रीमहोदयांकडे आमदार कैलास पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. यावर मंत्रीमहोदयांकडे केलेल्या मागणीवर सकारात्मकता दर्शवत यावर नक्कीच विचार करू,असे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांनी आश्वासन दिले.

 
Top