उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तेरणा साखर कारखाना जिल्हा बँकेमार्फत घेण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेली न्यायालयीन लढाईत उतरलेली ट्वेंटी शुगरकारखाना यांनी सदर प्रकरण लवकरात लवकर पूर्ण करून हा विषय त्वरित संपवावा   व कारखाना चालू करण्यासंदर्भात तेरणा सभासद व जनतेस सहकार्य करण्याची विनंती तेरणा साखर कारखाना मेन गेटवर शुक्रवार दि. 24 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते रणासंघर्ष बचाव समितीच्या सर्व सदस्यांनी केली.

तेरणा साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तेरणा कारखान्या वरील थकीत सव्वा तीनशे कोटी कर्जापोटी तब्बल पाच वेळेस निविदा काढली मात्र यास प्रतिसाद मिळाला नाही सहाव्या वेळेस निविदा 24 नोव्हेंबर रोजी भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर आदींनी निविदा खरेदी केल्या यात भैरवनाथ शुगरने वेळेच्या आत निविदादाखलके लेने जिल्हा बँक संचालक मंडळाने त्यांनी निविदेत टाकलेल्या आटी शरतीपेक्षा जास्त पैशाने निविदा भरले ने भैरवनाथ ला देण्यात आली व उशिरा आल्याचे कारण देऊन ट्वेंटीवन शुगरची निविदा फेटाळण्यात आली. यावर ट्वेंटीवन शुगर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मध्ये याचिका दाखल केली व भैरवनाथ शुगर ला तेरणा साखर कारखाना दिलेल्या भाडे करारा संदर्भात संशय व्यक्त केला त्याचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागून न्यायालयाने सात दिवसाची स्थगिती देऊन याबाबत डिआरटी कोर्टाकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले एकंदरीत तेरणा ची प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन तेरणा बचाव संघर्ष समितीने शुक्रवार तारीख 22 रोजी मेन गेट वर पत्रकार परिषद घेऊन ट्वेंटी सशुगरने संबंधित प्रकरणात प्रथमता डीआरटी कोर्टामध्ये जाऊ नये, जर ते गेल्यास याचा निकाल तात्काळ  लावून घ्यावा व न्यायालयीन विलंब प्रक्रियेत अडकू देऊ नये अशी कळकळीची विनंती ट्वेंटी शुगर चे सर्वेसर्वा वैद्यकीय मंत्री नामदार अमित देशमुख व त्यांच्या समूहाला करण्यात आलेली आहे याप्रसंगी तेरणा संघर्ष समितीचे सर्व सदस्य तेरणा चे सभासद, कामगार, अवलंबित घटक आवर्जून उपस्थित होते.

निविदा प्रक्रिये च्या पत्रकार परिषदे वरून तेरणा बचाव संघर्ष समितीमध्ये सुरुवातीला दोन गट पडतात की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती मात्र सर्वच मंडळीनीया मुद्द्यावर आक्रमकता न दाखवता विनंतीवजा  सूचना केल्याने संघर्ष टळला गेला असे उपस्थितातून सांगण्यात येत आहे.


 
Top