उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे बौद्ध स्मशानभूमीसाठीच्या शेड बांधकामाचे भूमिपूजन करून कामाला सुरवात  करण्यात आली. 

सदरील स्मशानभूमी साठी कुंभारी येथिल कै. माधवराव शिवराम वडणे यांनी बौद्ध समाजाला त्यांच्या गट न. ३७ मध्ये ५ गुंठे जागा दिली होती.ग्रामपंचायत सदस्य खंडू रोकडे , कुंभारीच्या सरपंच संगीत कोळी यांचे पती नागेश कोळी , पोलीस पाटील विठ्ठल वडणे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश कापसे , दिपक वडणे, संतोष वडणे यांच्या हस्ते सदरील कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरवात करण्यात आली.तसेच लवकरच दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामेही लवकरच होणार आहेत, असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.

    यावेळी पंडित पाटील, अमित धनके , दिलपाक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वजीत दिलपाक , संकेत दिलपाक , सचिन दिलपाक व ग्रामस्थ उपस्थित होते .

 
Top