तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता श्री खंडोबा मंदीरात चंपाषष्टी दिनी गुरुवार  दि.९रोजी दुपारी  मंहत खंडोबा पुजारी, मंदीर अधिकारी यांच्या  उपस्थितीत  घट उठवुन श्रीतुळजाभवानी मंदीरातील खंडोबा नवराञोत्सवाची  सांगता झाली.

 चंपाषष्टी दिनी  दुपारी बारा वाजता  श्रीतुळजाभवानीचे  वाकोजी बुवा, हमरोजीबुवा, गुरुचिलोजीबुवा, प्रशासकीय व्यवस्थापक  तथा तहसिलदार योगिता कोल्हे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, नागेश शितोळे,अभियंता भोसले, खंडोबा पुजारी औदुंबर वाघे  यांच्या उपस्थितीत घट उठवण्यात  आले . यावेळी खंडोबाचे पुजारी औदुंबर वाघे, श्रीकांत वाघे, अजित वाघे, संदीप वाघे, संकेत वाघे,  दादा वाघे,  तिरुपती वाघे, रोहित वाघे, सागर वाघे, प्रतिक वाघे व सर्व वाघे परिवारसह खंडोबा व देविभक्त मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top