तुळजापूर / प्रतिनिधी-

जिल्हाबँके मध्ये शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे उपलब्ध करुन देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली .

 जिल्हा बँकेमध्ये आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आले नाहीत . जो विमा सरकार व विमा कंपनीकडुन येत आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होत नाही . ते पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करुन शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करुन द्यावेत आणि शेतकऱ्यांना ताबडतोब रक्कम उचलता यावी या हिशोबाने शेतकऱ्यांना कर्ज खात्यामध्ये पैसे न कपात करता त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे आणि ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये पैसे उपलब्ध होत नाहीत अशा अनेक ग्रामीण शाखेमध्ये सुद्धा पैसे उपलब्ध करुन द्यावे , शेतकऱ्यांना पैसे उचलता यावी यासाठी स्वतः आपण लक्ष घालून आणि पैसे उपलब्ध कसे होतील यासाठी जिल्हा बँकांना व ग्रामीण शाखेला आदेश द्यावेत तसेच ज्या शेतकऱ्यांचे आँनलाईन आँफलाईन अर्ज  करावयाचे राहिले आहेत.अशा शेतकऱ्यांचा विचार व्हावा या मागणी चे निवेदन स्वाभिमानीशेतकरीसंघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्रइंगळे व धनाजी पेंदे  अमर हाजगुडे यांनी दिले.


 
Top