तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील काक्रंबा शिवारातील महिषासुरमर्दिनी स्टोन क्रेशर येथे १९ वर्षिय परप्रांतीय कामगार ढंपर वरुन खाली पडुन ठार झाल्याची घटना गुरुवार दि 23रोजी घडली . या प्रकरणी  पोलिसांनी  सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 काक्रंबा शिवारात महिषासुरमर्दिनी स्टोन क्रेशर असुन येथे नितीशकुमार योगीदर पुरी (१९ रा. गजादर टोले गोपालगंज बिहार) काम करीत होता ढंपर (क्रमांक MH25AJ 7273 ) चा चालक बबन दामु राठोड  याने आपल्या ताब्यातील ढंपर   वाहन निष्काळजीपणे मागेपुढे करीत असताना ढंपरवरुनखाली जमिनीवर पडल्याने डोक्यास मार लागुन मयत झाला. अशा दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी ढंपर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन मरणास कारणीभूत ठरल्या चा कारणावरुन त्याचा  विरोधात गुरनं -459/2021 कलम 304 ( अ ) 338 भादवी अन्वय गुन्हा नोंद केला असुन सपोनी चव्हाण यांच्या आदेशाने पुढील तपास पो. उपनिरक्षक रोटे हे करीत आहेत.


 
Top